वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार
प्रस्तुत लेखात कै. दा.म. जोशी यांच्या कादंबर्यांच्या साह्याने त्यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनाचा आलेख काढण्याचे योजिले आहे. तात्त्विक कादंबर्यांचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेखकाच्या कादंबर्यांत त्याच्या तत्त्वचिंतनाचे प्रतिबिंब पडलेले असेल असे मानणे गैर ठरू नये. जोश्यांच्या कादंबरीलेखनाचा काल १९१५ ते १९.३० असा वीस वर्षांचा आहे. या अवधीत त्यांनी एकूण पाच कादंबर्या लिहिल्या. या पाचही कादंबर्यांचा विषय …